आणिकही उदंड संतजन ।
1266.
आणिकही उदंड संतजन ।
राहिले व्यापून महीतळी ॥१॥
नामेचि पावन केले दोषी ।
उध्दार आणिकांशी करुनिया ॥२॥
गर्जती तेणे ब्रम्हानंदे ।
हरिनाम पदे आळविती ॥३॥
निळा म्हणे निमग्न झाले ।
हरिपदा पावले हरिनामे ॥४॥
1266.
आणिकही उदंड संतजन ।
राहिले व्यापून महीतळी ॥१॥
नामेचि पावन केले दोषी ।
उध्दार आणिकांशी करुनिया ॥२॥
गर्जती तेणे ब्रम्हानंदे ।
हरिनाम पदे आळविती ॥३॥
निळा म्हणे निमग्न झाले ।
हरिपदा पावले हरिनामे ॥४॥