ऐश्वर्याची वचनाक्षरे
1288.
ऐश्वर्याची वचनाक्षरे ।
वदती मधुरे तत्वदाती ॥१॥
श्रवण करिती सात्विक लोक ।
पावती सुख कैवल्य ॥२॥
भोगूनिया नित्यानंदा ।
सुखे निजपदा लिगटती ॥३॥
निळा म्हणे हे संत साधु ।
आर्तबंधु दीनांचे ॥४॥
1288.
ऐश्वर्याची वचनाक्षरे ।
वदती मधुरे तत्वदाती ॥१॥
श्रवण करिती सात्विक लोक ।
पावती सुख कैवल्य ॥२॥
भोगूनिया नित्यानंदा ।
सुखे निजपदा लिगटती ॥३॥
निळा म्हणे हे संत साधु ।
आर्तबंधु दीनांचे ॥४॥