वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 167. गोणाई व नामदेव यांचा संवाद

राही रखुमाई सत्यभामा

🙏 4. संत नामदेव · ABH-082502 · अभंग क्र. १२८४

1284.
राही रखुमाई सत्यभामा माता | सिकवा वो कांता बहुता परी ॥१॥
संत सनकादिक साक्ष हे सकळ | येणे माझे बाळ चाळविले ॥२॥
हा काय आमुचा धनी की गोसावी | नाही ते शिकवी लेकुरासी ॥३॥
जाला देव तरी पडो याच्या पाया | मैदावे केलिया भले नव्हे ॥४॥
भीड तुटलिया नेईन चोघा चारी | होईल समसरी यांची मज ॥५॥
देव कांही आम्ही नसति ऐकिले | परी नाही देखिले ऐसे कोठे ॥६॥
दर्शनेंचि जेथे जीवित्वाची हानी | नाठवे परतोनि घराचार ॥७॥
कैची वो पंढरी मी वो काय जाणे | याच्या पुत्रपणे देखियेली ॥८॥
या देवासी भेटी जन्ममरण तुटी | मावळली गोष्टी संसाराची ॥ ९ |तुम्ही अवघ्याजणी जीवाच्या सांगातिणी | पुसा याचे मनी काय आहे ॥१०॥
देऊनिया नामा मज लावा वाटे | गोणाई म्हणे वोखटे न करा देवा ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग