वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

एका नामे बहुत तरले ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089466 · अभंग क्र. १२८५

1285.
एका नामे बहुत तरले ।
एका भावे जे अनुसरले ।
एका तुमतेचि ते पावले ।
एकाएकी गोविंदा ॥१॥
एका जाणोनिया तुमते ।
एका रुसले अहंकाराते ।
एका विसरोनिया संसाराते ।
एका सुखाते पावले ॥२॥
एका तुमच्या निजध्यासे ।
एकाचि तुमच्या नामघोषे ।
एका तुमच्या कृपालेशें ।
आपणा ऐसे तुम्ही केले ॥३॥
एका तुमच्या कीर्तनमेळे ।
एका तुमच्या भावबळे ।
एकाएकींचि उठोनि पळे
पाप सगळे गोविंदा ॥४॥
निळा म्हणे एकाएकी ।
स्मरणमात्रेंचि झाले सुखी ।
एका नामोच्चारे मुखी ।
वैकुंठलोकी बैसविले ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग