उगाचि राहेन संतापासी
1275.
उगाचि राहेन संतापासी ।
सेवुनी चरणांसी निरंतर ॥१॥
पुसेन तया सांडूनी लाज ।
आपुलीये गुज अंतरीचे ॥२॥
फेडितील ते मनींची शंका ।
वचनेंचि एका क्षण्मात्रे ॥३॥
निळा म्हणे उणेंचि नाही ।
त्याचिये पायी निजानंदा ॥४॥
1275.
उगाचि राहेन संतापासी ।
सेवुनी चरणांसी निरंतर ॥१॥
पुसेन तया सांडूनी लाज ।
आपुलीये गुज अंतरीचे ॥२॥
फेडितील ते मनींची शंका ।
वचनेंचि एका क्षण्मात्रे ॥३॥
निळा म्हणे उणेंचि नाही ।
त्याचिये पायी निजानंदा ॥४॥