वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 167. गोणाई व नामदेव यांचा संवाद

लावोनि भवभये तुवा के

🙏 4. संत नामदेव · ABH-082526 · अभंग क्र. १२८३

1283.
लावोनि भवभये तुवा केले साचे | देह नव्हे याचे ऐसे केले ॥१॥
सुखभोग सर्व दिला टाकोनिया | नेणे तुझ्या पायांपरते कांही ॥२॥
ऐसे काय केले नामया चाळविले | समूळ बुडविले अपणांमांजी ॥३॥
आम्हा दुरबळांचा करोनिया घात | केला वाताहात घराचार ॥४॥
आता तुजविण कोणाचे साउली | पाळली पोसिली तुझी देवा ॥५॥
संकटी उदरी वाहिली म्या आशा | होता भरंवसा थोर यांचा ॥६॥
तंव तुवा लाविला आपुलिया संवे | नव्हे मज कांही ऐसा केला ॥७॥
काया वाचा माने सांडोनिया मज | अनुसरला तुज मनोभावे ॥८॥
नकळे तुझी माव काय या दाविले | परतेनासे केले चित्त याचे ॥९॥
आता माझा शीण निवारिल कोण | एका तुजविण पांडुरंगा ॥१०॥
गोणाई म्हणे देवा देई जीवदान | सुखाचे निधान नामा माझा ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग