वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 167. गोणाई व नामदेव यांचा संवाद

वाचेचेनि बळे दोलसी आ

🙏 4. संत नामदेव · ABH-082501 · अभंग क्र. १२८२

1282.
वाचेचेनि बळे दोलसी आगळे | मर्यादे वेगळे वायांविण ॥१॥
भ्रमलिस आरजे न पाहसी आपणाकडे | धारिष्ट केवढे पाहे तुझे ॥२॥
नेई आपला नामा काय चाड आम्हा | जरी आहे तुज भ्रम ममत्वाचा ॥३॥
पाहे पा पूर्वीचा कवणिये जन्मींचा | नकळे तुझा याचा ऋणानुंबंध ॥४॥
तो सरला की उरला विचारी आपुला | हा तुज अंतरला कवण्या गुणे ॥५॥
येणे सांडिला संसार वेव्हार लौकिक | अविद्या अहंभाविक दोन्ही नाही ॥६॥
हा प्रपंचावेगळा नकळे यांची लीला | लागलासे डोळा प्रेममुद्रा ॥७॥
ऐसी याची स्थिति देखोनिया डोळा | मज का वेळोदेळा छळितेसी ॥८॥
जाणसी त्या परी बुझावी बो याते | जेणे सुखे तूंते ओळखिला ॥९॥
याचेनि संसार चालविन म्हणोनी | ऐसी भ्रांती मनी धरिली वाया ॥१०॥
नामा अंतरी निमाला आत्मा असे उरला | तरंग निमाला जेवी जळी ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग