थिते माझे प्रेम घेऊन
1279.
थिते माझे प्रेम घेऊनि बैसला | अझुनि नुठी वाहिला नामा तुझा ॥१॥
जींवे भावे सर्वस्वे घेतले धरणे | म्या काय करणे ऐशियासी ॥२॥
कासया अपराध ठेविशील मज | शिकविते तुज नाही कोणी ॥३॥
संसारा गांजले जन्ममरणा उबगले | म्हणोनी शरण आले भयाभीत ॥४॥
कृपा उपजली जीवे अनुसरला | जीव गुंतला माझे ठायी ॥५॥
दवडिता वेगळे वोसंगा रिघाले बळे | बोलताहे साळे भोळे करुणावचनी ॥६॥
तेणे माझे हृदय कळवळले | म्हणोनि देखता डोळे निवती माझे ॥॥७॥
शरण आलिया ते म्या जरि अव्हेरावे | कोण कोणे आपंगावे सांग सत्य ॥८॥
शत्रुमित्र आदि करूनी सकळ | दु:ख अळूमाळ पडो नेदी ॥९॥
संसाराची येणे सांडियेली सोयी | प्राणे माझ्या ठायी अनुसरला ॥१०॥
आता याची लटिकी करी दूर आस | नामा म्हणे उदास सर्वस्वासी ॥११॥
