वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 167. गोणाई व नामदेव यांचा संवाद

निर्गुणपणांचा अभिमान

🙏 4. संत नामदेव · ABH-082503 · अभंग क्र. १२८०

1280.
निर्गुणपणांचा अभिमान सांडिला | निगम लाजविला नारायणा ॥१॥
कपट करोनि भक्तांसि तारिसी | तुझा तू ठकसी पंढरिराया ॥२॥
ठकूनी पुंडलिकासी न्यावया वैकुंठासी | या बुद्धी आलासी पंढरिये ॥३॥
तंव त्या भक्तराजे धरियेले चित्ते | परतोनि मागुते जाऊ नेदी ॥४॥
अठ्ठावीस युगे गेली विचारिता | निर्गम सर्वथा नव्हे देवा ॥५॥
मग कटावरी कर धरोनिया धीर | उभा निरंतर राहिलासी ॥६॥
सर्व घे प्रेमे ते हिरोनि बांधिले | विचारे साधिले कोणे कोणा ॥७॥
द्वारी द्वारपाळ जालासी अंकित | सांग बुद्धीमंत कोण ऐसा ॥८॥
नाथिलेनि करिसी आपणा गोंविसी | बोल का ठेविसी नामयाते ॥९॥
गोणाई म्हणे तुझे नकळे विंदान | देई कृपादान बाळ माझे ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग