आणिकातेही विठ्ठल करि
1265.
आणिकातेही विठ्ठल करिती ।
लागले संगती भाविक त्या ॥१॥
यांचा वारा लागेल ज्यासी ।
येती त्यासी मुक्तीही वरुं ॥२॥
घडता त्यांचे अवलोकन ।
होती पावन महा पापी ॥३॥
निळा म्हणे त्यांची भेटी ।
तेचि गाठी विठठलेचि ॥४॥
1265.
आणिकातेही विठ्ठल करिती ।
लागले संगती भाविक त्या ॥१॥
यांचा वारा लागेल ज्यासी ।
येती त्यासी मुक्तीही वरुं ॥२॥
घडता त्यांचे अवलोकन ।
होती पावन महा पापी ॥३॥
निळा म्हणे त्यांची भेटी ।
तेचि गाठी विठठलेचि ॥४॥