आवरुनिया ज्यांनी चित
1272.
आवरुनिया ज्यांनी चित्त ।
ठेविले सतत हरीचरणी ॥१॥
झाली त्याची कार्यसिध्दी ।
तुटल्या व्याधि जन्म जरा ॥२॥
एकविध भजले देवा ।
उतरले भव समुद्राते ॥३॥
निळा म्हणे निश्चय पदा ।
पावले गोविंदा आठविता ॥४॥
1272.
आवरुनिया ज्यांनी चित्त ।
ठेविले सतत हरीचरणी ॥१॥
झाली त्याची कार्यसिध्दी ।
तुटल्या व्याधि जन्म जरा ॥२॥
एकविध भजले देवा ।
उतरले भव समुद्राते ॥३॥
निळा म्हणे निश्चय पदा ।
पावले गोविंदा आठविता ॥४॥