वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 167. गोणाई व नामदेव यांचा संवाद

वडील वडील आमुची बोलत

🙏 4. संत नामदेव · ABH-082523 · अभंग क्र. १२६९

1269.
वडील वडील आमुची बोलतील गोष्टी | परी तुज ऐसा सुष्टी देव नाही ॥१॥
दर्षना आलिया पाडिसी आव्हाटा | मन मारूनी चोहाटा भुलविसी तू ॥२॥
ऐसा कैसा कोणे केलासिरे देव | आमुच्या जाणिया खेंच आणियेला ॥३॥
माझे बाळ तुझ्या दर्शनासी आले | ते त्वा भुलविले केशिराजा ॥४॥
रात्रिदिवस तुझ्या नामाचा रे छंदु | गोविद गोविद म्हणतसे ॥५॥
तान्ह भूक विसरला पिसाट पै जाला | नोळखे मजला काय करू ॥६॥
परतोनि संसाराची सांडियेली आस | दिसतो उदास सर्वापरी ॥७॥
लोकांची लेंकुरे का गा चाळविसी | आपणया ऐसे करसी भलत्यासी ॥८॥
आणिक असता नाश वेगळा थोर | मग माझा विचार कळता तुज ॥९॥
तुज एक वर्म पुंडलिक आहे | जेणे जडविले पाय विटेवरी ॥१०॥
याहुनी आणिक अधिक पावसी | आम्हा दुबळ्यासी कष्टविंता ॥११॥
मागे पुढे तुज ऐसेंचि फावले | ते तंव न चले मजसी कांही ॥१२॥
जीव मी देईन का नामा नेईन | नाव मी करीन गोतामाजी ॥१३॥
आता बरवे विचारी अगा ये श्रीहरी | माझा सामा करी मज आधीन ॥१४॥
नाही तरी जीवित्व वेचिन तुझ्या पायी | विनविते गोणाई केशिराजा ॥१५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग