वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

जन हे सुखाचे दिल्या

🙏 3. संत तुकाराम · ABH-078938 · अभंग क्र. १२७६

1276.
जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे । अंत हे काळीचे नाही कोणी ॥१॥
जाल्या हीन शक्ती नाकडोळे गळती । सांडोनि पळती रांडापोरे ॥धृपद॥
बाइल म्हणे खर मरता तरी बरे । नासिले हे घर थुंकोनिया ॥२॥
तुका म्हणे माझी नव्हतील कोणी । तुज चक्रपाणी वाचूनिया ॥३॥

अर्थ :
सर्व लोक सुखाचे सोबती आहेत आणि यांच्याशी देणे-घेणे केले तरच ते उपयोगी पडतात आणि यांच्याशी देणे-घेणे केले नाही तर यांना आपला काहीच उपयोग होत नाही. अंतकाळी कोणीही कोणाचे नाही. अरे तुझी शक्ति हीन झाली, तू म्हातारा झाला की तुझे नाक आणि डोळे गळायला लागतील त्या वेळी बायको आणि पोरे तुला सोडून पडतील. तुझी बायको ज्यावेळी तू घरात थुंकशील त्यावेळी म्हणेल खरेतर हा म्हातारा मेलेला बरा याने जागोजागी थुंकून माझे घर खराब केले. तुकाराम महाराज म्हणतात हे चक्रपाणी तुझ्या वाचून माझे कोणीच नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग