वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 166. गोणाई व नामदेव यांचा संवाद

आपणा वेगळा कशाला निव

🙏 4. संत नामदेव · ABH-082787 · अभंग क्र. १२६८

1268.
आपणा वेगळा कशाला निवडिसी | का मज दवडिसी सांग नाम्या ॥१॥
बरवे पुत्रपण जालासी उत्तीर्ण | आता अभिमान पाहे माझा ॥२॥
तुज नेल्यावीण नवजाय येथून | पंढरी गिळीन विठोबासहित ॥३॥
|माझेसी लेकरू मज आहे अव्हेरु | मज आहे निर्धारू विठोबासी ॥४॥
हा दानवांते छळी आपणा म्हणवी बळी | ते मजजवळी न चले कांही ॥५॥
विटेसहित चरणी बांधित आपुला गळा | क्षण जीवा वेगळा जाऊ नेदी ॥६॥
आसनी शयनी न विसंबे भोजनी | घालिन मुरडोनि हृदयामाजी |॥७॥
या देहाचा संकल्प आलेसे करोन | घातलेसे पाणी घरादारा ॥८॥
हा त्रिभुवनी समर्थ मी असे जाणत | पाहेन पुरुषार्थ आजी याचा ॥९॥
अठ्ठावीस युगे भरली तया बोला | धरोनि उभा केला पुंडलिके ॥१०॥
गोणाई म्हणे देवा होई का शहाणा | वाया का परधना धरिसी लोभु ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग