वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

नित्य नैमित्तिक कर्म

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086501 · अभंग क्र. १२७२

1272.
नित्य नैमित्तिक कर्म । जया न घडे हा धर्म । येणे उच्चारावें नाम । सत्य निर्धार जाणावा ॥१॥
नामे कर्माचा सुटे उपाधी । नामे तुटे आधी व्याधी । नामे शोक संदेह बुद्धी । नासतसे हरिनामें ॥२॥
नाना रोग तुटती नामे । घडती सर्व ब्रह्माकर्में । एका जनार्दनी नामे । धर्म सकळ साधती ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग