वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 167. गोणाई व नामदेव यांचा संवाद

ऐके गोणाई म्हणे केशि

🙏 4. संत नामदेव · ABH-082500 · अभंग क्र. १२७५

1275.
ऐके गोणाई म्हणे केशिराज | सदा अरज तुझे नामदेवा ॥१॥
संसारादि यासी नावडेचि कांही | मिठीच वो पायी घातलीसे ॥२॥
नेणो याच्या जीवे घेतलेसे कांही | लोळणींच पायी घातलिसे ॥३॥
पुसे वो जीवीचे काय काय' आवडे | उमगोनि कोडे नेई यासी ॥४॥
देता कांही न मागे नसता कांही नेघे | गुज पै न सांगे अंतरीचे ॥५॥
जन्मोनि सांकडे घातले वो कैसे | गिळिल मज ऐसे वाटतसे ॥६॥
|मी भावासि भुललो सांपडलो याचे हाती | करिल काय अंती न कळे कांही ॥७॥
एक वेळ मज सोडवी या पासोनी | दे का मज लागोसि जीवदान ॥८॥
माझिये पै बोले मजचि गोविले | याते आपंगिले अनाथ म्हणोनि ॥९॥
अंगोळिये धरिता खांदा वोळंगिये | आता माझे केले न चले कांही ॥१०॥
तू आपुलिया मनी विचारूनि पाही | नामा आपुला नेई आवडता ॥११॥
माय लेक दोघे साम्राज्य करा | घ्यावे धरणीवरी सुख याचे ॥१२॥
|कठिण बोल तुझे बहुसाळ ऐकिले | नाही त्वा गे पाहिले मागेपुढे ॥१३॥
आता तुझी कसी झांकोळिली माया | मज करिसी वाथ इष्ट तू गे॥१४॥
ऐसे देवाचे बोलणे ऐकोनि उदास | नाम्या जाले क्लेश तयेवेळी ॥१५॥
नामा म्हणे देवा ऐसे कैसे घडे | सृष्टीहि ये बुडे तरी न सोडी तुज ॥१६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग