वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 167. गोणाई व नामदेव यांचा संवाद

माझा नामा जंव नांवरू

🙏 4. संत नामदेव · ABH-082515 · अभंग क्र. १२७२

1272.
माझा नामा जंव नांवरूपा आला | जंव म्हणो लागला घरदार ॥१॥
|तंव कैसे विघ्न उठिले गे मावे | नामा पंढरिराये भुलविला ॥२॥
सांग बा विठ्ठला म्या काय केले | नामया का भुलविले कवण्या गुणे ॥३॥
आम्ही गा सिंपीये अनाथे पै दीने | करू सिवने टिपणे पोट भरू ॥४॥
त्यासी देवा तुवा आणियेला क्षयो | कैचा आम्हा देवो निर्मिलासी ॥५॥
असता चराचर न बुडता हे सृष्टी | का गा घेसी पाठी दुर्बळीची |॥६॥
एक बाळ माझे घरिली त्याची आस | त्या कैसी निराश मांडियेली ॥७॥
दिसा मासा गर्भ जाणोनिया पोटी | त्याची आस मोठी करिती लोक ॥८॥
एवढा माझा नामा कैसे विसरेन | देई कृपादान दुर्बळासी ॥९॥
|तू अनाथा गोसावी दीनाचा कैवारी | ते ब्रीद श्रीहरी काय जाले ॥१०॥
बिघडले पाडस करी एके ठायी | विनविते गोणाई केशिराजा ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग