नामा म्हणे माते परिय
1288.
नामा म्हणे माते परियेसी वचन | गुज मी सांगन अंतरीचे ॥१॥
धरोनि माझी वृत्ति पाहे माझे सुख | मी सांगतो ते ऐक जननिये ॥२॥
कायावाचामने ममत्व माझ्या ठायी | ते तू ठेवी पाई विठोबाचे ॥३॥
मग हा कृपासिंधु न विसंबेल तुज | अनाथांची लाज हाचि राखे ॥४॥
पाहे पा पशु जळचरे गांजिले | सकळी सांडिले जिवलगी ॥५॥
पितांबरासहित घालोनिया उडी | सोडविला पानेडी अनाथ म्हणोनी ॥६॥
प्रल्हादाकारणे जाला पै पिसाट | धरिले विकट रूप देवे ॥७॥
विदारुनी दैत्य आवेश बहुत | याने माझा भक्त गांजियेला ॥८॥
पांडवांचे काज करिता नाही लाज | म्हणे शरण मज अनव्य भावे ॥९॥
पाडसाकारणे जैसी कुरंगिणी | तैसा रानीवनी सांभाळित ॥१०॥
जन्मोनिया माझे बहु लळे केले | अडचणी सांभाळिले अनाथनाथे ॥११॥
नामा म्हणे यांचे दृढ धरिले चरण | कळिकाळापासोन सोडविले ॥१२॥
