वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 166. गोणाई व नामदेव यांचा संवाद

गोणाई म्हणे नाम्या र

🙏 4. संत नामदेव · ABH-082783 · अभंग क्र. १२६७

1267.
गोणाई म्हणे नाम्या राहिलासी उदरी | तेंहुनि मी करी आस तुझी ॥१॥
उपजलासि ते मज जाला संतोष | आनंद उल्हास वाटे जीवा ॥२॥
गणगोतामाजी केले बारे नांव | पंढरीचा देव प्रसन्न केला ॥३॥
रात्रंदिवस लेखी अंघोळीवरी | तू मज संसारी होसी म्हणोनि ॥४॥
तंव तुज अवचिती उपजली बुद्धी | भोपळा हा खांदी आवडला ॥५॥
हाती टाळ घेऊनी करिसी आळवणी | घांगरिया चरणी बांधोनिया ॥६॥
सांडोनि घर-दार आपुला संसार | नांचता विचार न धरिसी ॥७॥
नव्हे ते करिता कोण असे वारिता | परी त्वा आपुल्या हिता प्रवर्तावे ॥८॥
मी एक आहे तंव करीन तळमळ | मग तुझा सांभाळ करील कोण ॥९॥
या विठ्ठलावांचुनी तुज नाही संसार | हा बोल निर्धार सत्य माझा ॥१०॥
कोण्या गुणे तुवा घेतले धरणे | गोणाई म्हणे करणे फळा आले ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग