जपतां नाम पडे धाक ।
1271.
जपतां नाम पडे धाक । पातकें पळती त्रिवाटे देख । कळिकाळाचे नासे दुःख । ऐसे नामी सामर्थ्य ॥१॥
जप तप नामावळी । आणिक नको मंत्रावळी । ब्रह्माज्ञान बोली । वाया शीण आटाआटी ॥२॥
साधने पुण्य असेल गांठी । तरीच नाम येईल होटीं । एका जनार्दनी पोटी । दया शांति आकळे ॥३॥
