मुख्य महाविष्णु चैतन
3.
मुख्य महाविष्णु चैतन्याचे मूळ । सांप्रदाय फळ तेथोनिया ॥१॥
हंसरुपी ब्रम्हा उपदेशी श्रीहरी । चतु:श्लोकी चारी भागवत ॥२॥
ते गुज विधाता सांगे नारदासी । नारदे व्यासासी उपदेशिले ॥३॥
राघव चैतन्य केले अनुष्ठान । त्यासी द्वैपायने कृपा केली ॥४॥
कृपा करुनि हस्त ठेवियेला शिरी । बोध तो अंतरी ठसावला ॥५॥
राघवा चरणी केशव शरण । बाबाजीशी पूर्ण कृपा त्याची ॥६॥
बाबजीने स्वप्नी येऊनि तुकयाला । अनुग्रह दिला निज प्रीति ॥७॥
जगद्गुरु तुका अवतार नामयाचा । संप्रदाय सकळांचा येथुनिया ॥८॥
निळा म्हणे मज उपदेश केला । संप्रदाय दिला सकळ जना ॥९॥
