आकाशीची वाणी सांगे स
3.
आकाशीची वाणी सांगे सकळांसी । तळमळ मानसी करु नका ॥१॥
देवकीच्या गर्भा येईल भगवान । रक्षील ब्राम्हण गाई भक्त ॥२॥
उतरील भार मारील दैत्यासी । आनंद सर्वांसी करील तो ॥३॥
रोहिणी उदरी शेष बळिभद्र । यादव समग्र व्हा रे तुम्ही ॥४॥
ऐकोनिया ऐसे आनंद मानसी । येती स्वस्थळासी नामा म्हणे ॥५॥
