वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 14. ईतर प्रकरणे › १०. पूजेचे अभंग

कासयाने पूजा करू केश

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073453 · अभंग क्र. ३

3.
कासयाने पूजा करू केशीराजा । हाचि संदेह माझा फेडी आता ॥१॥
उदके न्हाणू तरी स्वरूप ते तुझे । तेथे काय माझे वेचे देवा ॥२॥
गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ । तेथे मी दुर्बळ काय करू ॥३॥
फळदाता तूंच तांबोल अक्षता । तेथे काय आता वाहो तुज ॥४॥
वाहू दक्षिणा तरी धातु नारायण । ब्रह्म तेचि अन्न दुजे काई ॥५॥
गाता तू ॐकार टाळी नादेश्वर । नाचावया थार नाही कोठे ॥६॥
तुका म्हणे मज अवघे तुझे नाम । धूप दीप रामकृष्णहरि ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग