करिती उत्छाह वारसा ब
3.
करिती उत्छाह वारसा ब्राह्मण ।
करुणी भोजन घरा गेले ॥१॥
पिता आऊदेव गेला अरण्यात ।
तव अकस्मात लाभ जाला ॥२॥
मोहर बांधली पितांबरी-गाठी ।
सापडली वाटी वेरुळाच्या ॥३॥
घरा येउनीया आनंदे बोलती ।
कन्या आम्हाप्रती लाभाईत ॥४॥
वीरेश्वर द्विज ज्योतिषी नेटका ।
तयाने पत्रिका संपादिली ॥५॥
होईल कल्याण इचेनि तुमचे ।
ऐसे पत्रिकेचे फळ वाची ॥६॥
देवलसी काही भाग्याची होईल ।
आयुष्याचे बळ फार आहे ॥७॥
बहेणि म्हणे ऐसे द्विजे सांगितले ।
तयासी दिधले वस्र गाई ॥८॥
