आले देवाजीच्या मना ।
3.
आले देवाजीच्या मना । तेथे कोणाचे चालेना ॥१॥
हरिश्चंद्र ताराराणी । वाहे डोंबा घरी पाणी ॥२॥
पांडवांचा साहाकारी । राज्यावरोनी गेले दुरी ॥३॥
तुका म्हणे उगेचि राहा । होईल ते सहज पाहा ॥४॥