वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 13. एकादशी, द्वादशी, व क्षिरापतीचे अभंग › २. द्वादशी अभंग

माझा हा विठोबा येईल

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073397 · अभंग क्र. ३

3.
माझा हा विठोबा येईल गे जेव्हा । जेवीन मी तेव्हा गोणाबाई ॥१॥
जाऊनि राउळा तयासी तू पाहे । लवकरी बाहे भोजनासी ॥२॥
भरलिया रागे क्रोध त्याचा साहे । लवकरी बाहे भोजनासी ॥३॥
ज्ञानेश्वरा घरी असेल बैसला । जाऊनि विठ्ठला पाहे तेथे ॥४॥
जनी म्हणे देवा चला पुरुषोत्तमा । खोळंबला नामा भोजनासी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग