वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 1. रविवारचे अभंग

नव्हे तेचि कैसे झाले

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073675 · अभंग क्र. ३

3.
नव्हे तेचि कैसे झाले रे खेळिया । नाही तेचि दिसू लागले रे ।
अरूप होते ते रूपासी आले । जीव शिव नाम पावले रे ॥१॥
आपुलीच आवडी धरूनि खेळिया । आप आपणाते व्याले रे ।
जोपनाकारणे केली बायको । तिने एवढे वाढविले रे ॥२॥
ऐक खेळिया तुज सांगितले । ऐसे जाणुनि खेळ खेळे रे ॥धृ॥
ब्राम्हणाचे पोर एक खेळासी भ्याले । ते बारा वर्षे लपाले रे ।
कांपत कांपत बाहेर आले । ते नागवेंचि पळून गेले रे ॥३॥
सहातोंड्या एक संभूचे बाळ । त्याने बहुतचि बळ आथियेले रे ।
खेळ खेळता दगदगी व्याले । ते कपाट फोडुनि गेले रे ॥४॥
चहुंतोड्याचा पोर एक नार्‍याही जाण । तो खेळियांमाजी आगळा रे ।
कुचाळी करूनि पोरे भांडवी । आपण राहे वेगळा रे ॥५॥
गंगा गौरी दोघी भांडवी । संभ्यासी धाडिले वना रे ।
खेळ खेळे परि डायी न सांपडे । तो एक खेळिया शहाणा रे ॥६॥
खेळियामाजी हनुम्या शहाणा । न पडे कामव्यसनी रे ।
कामचि नाही तेथे क्रोधचि कैचा । तेथे कैंचे भांडण रे ।
रामा गड्याची आवडी मोठी । म्हणूनि लंके पेणे रे ॥७॥
यादवांचा पोर एक गोप्या भला । तो बहुतचि खेळ खेळला रे ।
लहान थोर अवघी मारिली । खेळचि मोडुनि गेला रे ॥८॥
ऐसे खेळिया कोट्यानुकोटी । गणीत नाही त्याला रे ।
विष्णुदास नामा म्हणे वडील हो । पाहा देही शोधूनि रे ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग