वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › १. मंगला चरण

प्रथम नमू गजवदनु । ग

🙏 4. संत नामदेव · ABH-083803 · अभंग क्र. २

2.
प्रथम नमू गजवदनु । गौरीहराचा नंदनु ।
सकळ सुरवरांचा वंदनु । मूषकवाहनु नमियेला ॥१॥
त्रिपुरावधी गणाधिपति । हरे पूजिला भावे भक्ति ।
ऎके बाणे त्रिपूरा पाडिला क्षिती । तै पशुपति संतोषला ॥२॥
इंद्रादिकी अष्टलोकपाळी । लंबोदरु पुजिला कनककमळी ।
त्यासी प्रसन्न झाला तयेवेळी । म्हणवूनि सकळी पूजियेला ॥३॥
सटवे रात्री मदनु शंभरे नेला । प्रद्युन्न समुद्रामाजी टाकिला ।
तै कृष्णे विघ्नहरु पूजिला । प्रद्युन्न आला रतीसहित ॥४॥
पूजिला साही चक्रवर्ति । त्यांचिया पुरतीआर्ती ।
युधिष्ठरे पूजिला चतुर्थी । राज्यप्राप्ति झाली तया ॥५॥
म्हणवूनि सुरवरी केली पूजा । त्रिभुवनी आणिक नाही दुजा ।
विष्णुदास नामा म्हणे स्वामी माझा । भावे भजा एकदंता ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग