ब्रह्ममूर्ती संत जगी
3.
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ।
उद्धरावया आले दीन जना ॥१॥
ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी ।
नाम घेता वदनी दोष जाती ॥२॥
हो का दुराचारी विषयी आसक्त ।
संत कृपे त्वरित उद्धरती ॥३॥
अखंडित नामा त्यांचा वास पाहे ।
निशिदिनी ध्याये सत्संगती ॥४॥
संत संग महिमा अभंग समाप्त
