ऐका पंढरीचे महिमान ।
3.
ऐका पंढरीचे महिमान । राउळे तितुके प्रमाण ।
तेथील तृण आणि पाषाण । तेहि देव जाणावे ॥१॥
ऐसी पंढरी मनी ध्याती । त्यांसी तिही लोकी गति ।
ते आणिका तीर्था जाती । ती वंदिती तयांसी ॥२॥
वाराणसी चालिजे मासा । गोदावरी एक दिवसा ।
पंढरी पाऊल परियेसा । ऐसा ठसा नामाचा ॥३॥
ऐसे शंकर सांगे ऋषीजवळी । सकळ तीर्थेमाध्यान्हकाळी ।
येती पुंडलिकाजवळी । करिती अंघोळी वंदिती चरण ॥४॥
ऐसेनि तीर्थी पाप घडे । ऐसे बोलता जिव्हा झडे ।
नामा विनवी संतांपुढे । पंढरी पेठ न सांडावी ॥५॥
