वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › १. मंगला चरण

गणेश नमू तरी तुझाचि

🙏 4. संत नामदेव · ABH-083804 · अभंग क्र. ३

3.
गणेश नमू तरी तुझाचि नाचणा । म्हणोनि नारायणा नमन तुज ॥१॥
सारजा नमू तरी ते तुझी गायनी । म्हणोनि चक्रपाणी नमन तुज ॥२॥
ब्रह्मा नमु तरी तो तुझिये कुशी । म्हणोनी हृषीकेशी नमन तुज ॥३॥
शंकर नमू तरी तो तुझी विभूति । म्हणोनि कमळापति नमन तुज ॥४॥
वेद नमू तरी तुझाचि स्थापिता । म्हणोनि लक्ष्मीकांता नमन तुज ॥५॥
इंद्र नमु तरी तुझिया त्या भुजा । म्हणोनि अधोक्षजा नमन तुज ॥६॥
गंगा नमू तरी ती तुझे अंगुष्ठी । म्हणोनि जगजेठी नमन तुज ॥७॥
लक्ष्मी नमु तरी ते तुझे पायातळी । म्हणोनि वनमाळी नमन तुज ॥८॥
नामा म्हणे भेटी जाहली पै राया । कोण गणी बाया सेवकासी ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग