तुम्ही विश्वनाथ । दी
3.
तुम्ही विश्वनाथ । दीन रंक मी अनाथ ॥१॥
कृपा कराल ते थोडा । पाया पडिलो बराडी ॥२॥
काय उणे तुम्हापासि । मी तो अल्पाची संतोषी ॥३॥
तुका म्हणे देवा । काही भातुके पाठवा ॥४॥
4 .
भस्म उटी रुंडमाळा । हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा ॥१॥
गजचर्म व्याघ्रांबर । कंठी शोभे वासुकी हार ॥२॥
भुते वेताळे नाचती । हर्ष युक्त उमापती ॥३॥
सर्व सुखाचे आगर । म्हणे नरहरी सोनार ॥४॥
5 .
शिव भोळा चक्रवर्ती । त्याचे पाय माझे चित्ती ॥१॥
वाचे वदता शिवनाम । तया न बाधी क्रोध काम ॥२॥
धर्म अर्थ काम मोक्ष । शिवा देखता प्रत्यक्ष ॥३॥
एका जनार्दनी शिव । निवारी कळी काळाचा भेव ॥४॥
