वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 11. संत मुक्ताबाई › 1.संत मुक्ताबाई अभंग गाथा › 1. संत मुक्ताबाई संपूर्ण अभंग गाथा एकूण अभंग 53 › ३.संत मुक्ताबाई अभंग – उपदेशपर

संत मुक्ताबाई अभंग –

🙏 11. संत मुक्ताबाई · ABH-073744 · अभंग क्र. ३

३.संत मुक्ताबाई अभंग – उपदेशपर

२०.
सहस्रदळी दळीं हरि आत्मा हा कुसरी ।
नांदें देहा भीतरी अलिप्त सदां ॥१॥
रविबिंब बिंबे घटमठीं सदा ।
ते नातळे पे कदा तैसे आम्हा ॥२॥
अलिप्त श्रीहरि सेवी का झडकरी।
सेवितां झडकरी हरिच होआल ॥३॥
चंदनाच्या दूर्ती वेधल्या वनस्पती।
तैसे आहे संगतीं या हरिपाठे ॥४॥
मुक्ताई चिंतित चिंतामणी चित्तीं ।
इच्छिले पावती भक्ता सदा ॥५॥

२१.
देवींचा देवो घरभरी भायो |
कजसेवीण वाचो जातु असे ॥१॥
जाताती वाउगे नटनाट्यसोंगें ।
चित्तअनुरागं भजतीना ॥२॥
असोनि न दिसे उगयाचि पिसे ।
घेती वाया वसे सज्जनेवीण ॥३॥
रावोरंक कोहं न म्हणेचि सोहं ।
साकारलें आहे न कळे तया ॥४॥
भ्रांतीचेनि भूली वायाचि घरकुली।
माया आड ठेली अरे रथा॥५॥
मुक्ताई परेसी दुमतें चहंगी ।
सत्राची सर्वरस एका देवे ॥६॥

२२.
विश्रांति मनाची निजशांति साची ।
मग त्या यमाची भेटी नाही ॥१॥
अधिकारी मन मग सारी स्नान ।
रोकडेंचि साधन आले हाता ॥२॥
साधिलें साधन नित्य अनुष्ठान ।
चित्तीं नारायणमंत्र जपे ॥३॥
मुक्ताई प्रवीण नारायण धन।
नित्य मंत्र स्नान करी वेगी ॥४॥

२३.
मुक्तपणे सांग देवो होय ।
देवांग मीपणे उद्वेग नेघे स्था ॥१॥
वाउगे मीपण आथिलें प्रवीण ।
एक नारायणतत्त्व खरे ॥२॥
मुक्ता मुक्ती दोन्ही करी कारे शिराणी।
द्वैताची काहाणी नाही तुज ॥३॥
मुक्ताई अद्वैत द्वैतीं द्वैतातीत ।
अवघाचि अनंत दिसे देही ॥४॥

२४.
अंतर वाह्य निकें सर्व इंद्रियांचे ।
चोज निजी निजबीज एकतत्त्व ॥१॥
आदि नाही अनादि नाही ।
तें रूप पाही अविट बाईये ॥२॥
मुक्ताई संजीवन तत्त्वता निर्गुण ।
आकार सगुण प्रपंचींचा ॥३॥

२५.
नामबळें देही असोनि मुक्त ।
शांति क्षमा चित्त हरिभजन ॥१॥
दया धरा चित्तीं सर्वभूती करुणा ।
निरंतर वासना हरिरूपीं ॥२॥
माधव मुकुंद हरिनाम ।
चित्ती सर्वमुक्ति नामपायें ॥३॥
मुक्ताईये धन हरिनामें उच्चारु ।
अवघाचि संसारु मुक्त केला ॥४॥

२६.
करणे जंव कांहीं करू जाये शेवट ।
तव पडे आडवाटे द्वैतभावें ॥१॥
राहिले करणे नचले में कर्म ।
हरिविण देहधर्म चुकताहे ॥२॥
मोक्षालागीं उपाय करितोसि नाना ।
तंव साधनी परता पडो पाहे ॥३॥
मुक्ताई करि हरि श्रवण पाठ।
तेणे मोक्षमार्ग नीट सकळ साधे ॥४॥

२७.
मुक्तपणे ब्रीद बाधोनियां द्विज ।
नेणती ते बीज केशव हरी ॥१॥
ज्याचेनि मुक्तता सर्वही पे मुक्त।
करूनिया रत न सेविती ॥२॥
वेदीं बोलियेले ब्रह्मार्पणभावें ।
सदा मुक्त व्हावे अरे जना ॥३॥
मुक्ताई मुक्त हरिनाम सेवित ।
अवघेचि मुक्त सेवितां हरी ॥४।

२८.
उजियेडु कोडे घेतलो निवाडे ।
आपुलिये चाडे जीवनकळा ॥१॥
एकरूप दिसे सर्वाघटीं भासे ।
एक हृषिकेशें व्यापियेलें ॥२॥
त्रिपुटि भेदुनी सर्वत्रगामिनी ।
एका रूपे मोहिनी तेही सदां ॥३॥
नित्यता उन्मत्त अवघेचि भरित ।
एकतत्त्वे दावित सोहं भावे ॥४॥
मुक्ताई सांगती कैसेनि गुंपती ।
मायादेवी समाप्ति निजतत्त्वी ॥५॥

२९.
विस्तारूनि रूप सांगितले तत्त्वीं।
कैसेनि परतत्त्वीं वोळखी जाली ॥१॥
सोहंभावें ठसा कोणते पैठा ।
उभाउमी वाटा कैसा जातु ॥२॥
या नाही सज्ञान हा अवघा ज्ञान ।
आपरूप धन सर्वारूपीं ॥३॥
मुक्ताई मुक्तता सर्वपर्णे पुरता ।
मुक्ता मुक्ति अपेता निजबोधें ॥४॥

३०.
मुक्तामुक्त कोर्डे पाहिले निवाडें।
ब्रह्मांडा एवढे महत्तत्त्व ॥१॥
निजतत्त्व आप अवघाचि पारपाक ।
एका रूपे दीपक लावियेला ॥२॥
आदि मध्यनिज निर्गुण सहज ।
समाधि निजतेज आम्हा रामू ॥३॥
मुक्ताईचे धन आत्माराम गूण ।
देखिले निधान हृदय घटी ॥४॥

३१.
निर्गुणाची सैज सगुणाची बाज ।
तेथे केशीराज पहुडले ॥१॥
कैसे याचे करणे दिवसां चांदि ।
सावळें उठणें एका तत्त्वें ॥२॥
नाही या ममता अवघीच समता ।
आदि अंतु बिंबतां नलगे वेळू॥३॥
मुक्ताई सधन सर्वत्र नारायण ।
जीव शिव संपूर्ण एकतत्त्वे ॥४॥

३२.
दिवसात निसीसीर अध केवळ निजवीज ॥१॥
या आदि नाही अनादिही नाही ।
कैचा मोहप्रवाही दिसेचिना ॥२॥
शक्तीचे संपुष्टीं मुक्ता मुक्त घट ।
अवघे वैकुंठ दिसताहे ॥३॥
मुक्ताई परिपाक अवघे रूप ।
एक देखिले सम्यक सोहं भावे ॥४॥

३३.
जेथे जें पाहे तेथें ते आहे ।
उभारोनि बाहे वेद सांगे ॥१॥
सोमकांतीं झरा कोठील दुसरा ।
तत्त्वीं तत्त्वें धरा निजदृष्टीं ॥२॥
हेतु मातु आम्हा अवघाचि परमात्मा ।
सोहंभावें सोहं आत्मा सर्वी असे ॥३॥
मुक्तलग खुण मुक्ताई प्रमाण ।
देही देहो सौजन्य निजतेजें ॥४॥

३४.
पूर्णपणे सार अविट आचार ।
सारासार विचार निजतेजे ॥१॥
निर्गुणीं आकार सर्वत्र साकार ।
एकरूपें विचार निजतेजें ॥२॥
मुक्ताई चैतन्य अवधि पर ।
आदि अंतु खुण निवृत्तीची ॥३॥

35.
आदि मध्य अंतु न कळोनि प्रांतु ।
असे जो सततु निजतत्त्वें ॥१॥
कैसेनि तत्त्वता तत्त्व मैं अनंता ।
एकतत्त्वे समता आपेंआप ॥२॥
आप जंव नाही पर पाहासी काई ।
विश्वपर्णे होई निजतत्त्वी ॥३॥
माजि मजवटा चित्त नेत तटा।
परब्रह्म वैकुंठा चित्तानुसारे ॥४॥
मुक्ताई सांगती मुक्तनामपंक्ति।
हरिनामें शांति प्रपंचाचीं ॥५॥

३६.
मुक्तलग चित्ते मुक्त पै सर्वदा ।
रामकृष्ण गोविंदा वाचे नित्य ॥१॥
हरिहरिछंदु तोडी भवकं ।
नित्य नामानंद जपे रया ॥२॥
सर्वत्र रूपडें भरलेंसे दृश्य ।
ज्ञाता ज्ञेय भासे हरिमाजी ॥३॥
मुक्ताई सधन हरी रूप चित्तीं ।
संसारसमाप्ति हरिच्या नामे ॥४॥

37.
चित्तासी व्यापक व्यापूनि दुरी ।
तेंचि माजि घरी नांदे सदां ॥१॥
दिसे मध्य सुख मुक्तलग हरी।
शांति वसे घरी सदोदित ॥२॥
नाही या शेवट अवघाचि निघोट ।
गुरुतत्त्व वाट चैतन्याची॥३॥
मुक्ताई संपन मुक्त सेजुले ।
सर्वत्र उपविमुक्ति चोख ॥४॥

३८.
प्रारम्भ संचित आचरण गोमटें |
निवृत्तितटाके निघालों] आम्ही ॥१॥
मुळींचा पदार्थ मुळींच में गेला |
परतोनि अबोला संसारासी ॥२॥
सत्यमिध्याभाव सत्वर फळला |
हृदयी सामावला हरिराज ॥३॥
अव्यक्त आकार साकार हे स्फुर्ति ।
जीवेंशिव प्राप्ति ऐसे केलें ॥४॥
सकामनिष्कामवृत्तीचा निजफेर |
वैकुंठाकार दाखविलें॥५॥
मुक्तलग मुक्त मुक्ताईचे तट |
अवर्षेचि वैकुंठ निघोट रवा ॥६॥

३९.
शांति क्षमा बसे देही देव पैसे |
चित्त समरसें मुक्त मेळु ॥१॥
निर्गुणें उपरमु देव पुरुषोत्तम |
प्रकृति संगम चेतनेचा ॥२॥
सज्ञानीं दिवटा अज्ञानी तो पैठा |
निवृत्तीच्या तटा नेतु भक्ता ॥३॥
मुक्ताई दिवस अवघा हृषीकेश |
केशर्वेविण वास शून्य पैसे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग