आश्विनशुद्धपक्षी अंब
2.
आश्विनशुद्धपक्षी अंबा बैसलि सिंहासनी हो ।
प्रतिपदेपासुन घटस्थापना ती करुनि हो ।
मुलमंत्रजप करुनी भोवतें रक्षक ठेउनि ।
हो ब्रह्मविष्णुरुद्र आईचे पुजन करिती हो ॥ १ ॥
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ धृ. ॥
द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनि हो ।
सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।
कस्तुरीमळवट भांगी शेंदूर भरुनी हो उदोकारे गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो ॥ उदो. ॥ २ ॥
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो ।
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो ।
कंठीची पदके कांसे पितांबर पिवळा हो ।
अष्ठभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥ उदो. ॥ ३ ॥
चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो ।
उपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणीं हो ॥
पूर्णकृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो ।
भक्तांच्या माउली सुर ते येती लोटांगणी हो ॥ उदो.॥ ४ ॥
पंचमीचे दिवशी व्रत तें उपांगललिता हो ।
अर्घ्यपाद्यपीजनें तुजला भवानी स्तविती हो ॥
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो ।
आनंदे प्रेम ते आले सद्भावें क्रीडतां हो ॥ उदो. ॥ ५ ॥
षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो ।
घेउनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो ॥
कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफलांचा हो ।
जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळा हो ॥ उदो.॥ ६ ॥
सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरीहो ।
तेथें तू नांदसी भोवतें पुष्पें नानापरी हो ॥
जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो ।
भक्तसंकटी पडतां झेलूनि घेसी वरचे वरी हो ॥ उदो. ॥ ७ ॥
अष्टमीचे दिवशी अष्टभुजां नारायणी हो ।
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ।
मन माझें मोहिले शरण आलो तुजलागुनी हो ।
स्त्नपान देऊनि सुखी केले अंत:करणी हो ॥ उदो. ॥ ८ ॥
नवमीचे दिवशीं नवदिवसाचे पारणें हो ।
सप्तशतीजप होम हवनें सद्भक्ती करुनी हो ।
षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो ।
आचार्याब्राह्मणां तृप्त केले कृपेकरुनी हो ॥ उदो. ॥ ९ ॥
दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोलंघनी हो ।
सिंहारुढे दारुण शस्त्रें अंबे त्वां घेऊनी हो ।
शुंभनिशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो ।
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो ।
उदो. ॥ १० ॥
