वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 14. ईतर प्रकरणे › १. प्रारब्ध पर अभंग

परियेसी गव्हारा सादर

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073426 · अभंग क्र. ३

3.
परियेसी गव्हारा सादर । कर्मे निर्वंश झाले सगर ।
भिल्ले विंधिले शारंगधर । झाला पुरंदर सहस्त्रनयन ॥१॥
कर्मे मन्मथ झालासे राख । कर्मे चंद्रासि घडला दोष ।
कर्मे भार वाहती कूर्म शेष । कर्मे खरमुख ब्रह्म देखा ॥२॥
कर्मे वासुकी लंके दिवटा । कर्मे हनुमंता उदरी कांसोटा ।
कर्मे शकुदेव गर्मी कष्टा । पाताळ वाटा बळी गेला ॥३॥
कर्मे दशरथ वियोगे मेला । कर्मे श्रीराम वनवासा गेला ।
कर्मे रावण क्षयो पावला । वियोग घडला सीतादेवी ॥४॥
कर्मे दुर्योधनादि रणी नासले । कर्मे पाडंव महापंथे गेले ।
कर्मे सिंधु जळ शोषिले । नहुष झाला सर्प देखा ॥५॥
कर्माते शुभ मानी आपण । किती पळसी कर्माभेण ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला शरण । केली कर्मे निवारी नारायण ॥६॥

प्रारब्ध पर अभंग समाप्त

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग