वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 9. देव जन्माचे अभंग › 1. श्री राम जन्माचे अभंग

येतसे दशरथ सुमित्राम

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073315 · अभंग क्र. ३

3.
येतसे दशरथ सुमित्रामंदिरी । देखता सामोरी येती झाली ॥१॥
न माये आनंद तियेचे मानसी । ठेवी मस्तकासी चरणावरी ॥२॥
घालोनी आसन प्रक्षाळी चरण । सर्वांगी लेपन तीर्थोदके ॥३॥
गंध धूप दीप पुष्पांचिया माळा । अर्पूनी तांबुला उभी राहे ॥४॥
कैकयीचे दु:ख विसरला राव । पाहोनिया भाव सुमित्रेचा ॥५॥
होती जे डोहळे तुझिये मानसी । सांग मजपाशी पतिव्रते ॥६॥
प्राणनाथ ऐसे वाटतसे जीवा । वडिलांची सेवा अहर्निशी ॥७॥
आवडे हे एक नावडे आणिक । द्यावे मज एक हेचि आता ॥८॥
ऐकतांचि ऐसे कांतेचे वचन । आनंदे निमग्न मन होय ॥९॥
घेऊनिया हाती रत्‍नांचे भूषण । टाकी ओवाळून नामा म्हणे ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग