वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 5. सर्व आरती संग्रह › 8. ग्रंथांच्या आरत्या

जय हो जय श्री भागवता

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-090247 · अभंग क्र. २

2.

जय हो जय श्री भागवता

जय हो जय श्री भागवता ।
आरती करू तुज भगवंता ।
श्री शुक मुनीने । परम भक्तीने ।
नाना परीने । गाईयेले ज्या हरि चरिता ॥१॥
आरती...

वेद तरूचे मधुर फळ ।
स्वादु रसे जे सोज्वळ ।
आत्माराम मुनी अचल ।
सेवुनी झाले जन सुफळ ।
पाहा पर्वणी आणि ।
आली अवनी ।
हि अघ हरणी ।
भावजल तरणी । ती पतिता ॥२॥
आरती......

येथे व्यासांची वाणी ।
सार्थक हरि गुण गाउनी ।
शास्त्र पुराणी मुकुटमणी ।
परम प्रेमामृत जननी ।
सहज सेविता ।
भाविक भक्ता ।
उदार दाता ।
मोक्ष तत्वता । दे हाता ॥३॥
आरती......

गमते जणू मानस तीर्थ ।
व्दादश सोपाने युक्त ।
निर्मळ भक्ती जले भरीत ।
विहरे हरि हंसची चित्त ।
लोक सुकमळे । संत व्दिज कुळे ।
सेउनी रमले । भान हरपले । रस पिता ॥४॥
आरती.....

अपार महिमा ग्रंथांचा ।
वदवेना कोणा साचा ।
प्राणची किर्तनकारांचा ।
मेवा कवीवर संतांचा ।
जणू बोधाचा । स्वयं प्रज्ञेचा ।
व्दादश कुळीचा ।
रवी अंतरीचा । तम हरता ॥५॥
आरती.....

ग्रंथ नोव्हे हा श्री कृष्ण ।
गीते वेधी मन पूर्ण ।
अनन्य होता या शरण ।
खचित टळे जन्म मरण ।
त्रिताप जाती । चिर ये शांती ।
नाथ हि वदती ।
राम पदी ठेऊ माथा ॥६॥
आरती......

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग