वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 34. संत नवनाथ - नवनारायण › 1. नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध › 3. नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध) › ०. नवनाथ आरती संग्रह

जयदेव जयदेव जय नवनाथ

🙏 34. संत नवनाथ - नवनारायण · ABH-081105 · अभंग क्र. ३

3.
जयदेव जयदेव जय नवनाथा ।
भक्तगण उद्धरी देउनी सिद्ध करा ।।धृ ।।
मच्छिन्द्र गोरख तैसे जालिंदरनाथ ।
कानिफ गहिनीनाथ नागेशासहित ।
चर्पटी भर्तरी रेवण मिळुनी नऊनाथ ।
नवनारायण अवतार संत ।।१।।

भक्तीशक्ती बोधावैराग्यहीत ।
तापत्रय ते हरिती स्मरा एकचित्त ।
नमने चरित्र पठणे दुरितांचे अंत ।
भक्त जणांशी तारी नवनाथ खचित ।।२।।

इहपर साधूंनी देती समस्त नवनाथ ।
भूत समंधा प्रेता घालविती सत्य ।
भक्त जणांचे पुरवा तुम्हीच संकल्प ।
कृतार्थ होता दावा सदानंद रूप ।।३।।

दुखी दरिद्री लोकांना तारा ।
देउनी सुख संपत्ती मुक्ती दोही करा ।
स्मरन करावे आता नित्य नित्यनाथा ।
शरणागत मी तुमच्यापायी मम माथा ।।४।।

नवनाथची आधार सकलांना आता ।
आरती ओवाळिता हरळी भवचिंता ।
ब्रम्ह सनातन शांती देई मम चित्ता ।
शरण विनायक लोटांगण आता ।।५।।

जयदेव जयदेव जय ‘नवनाथा’
आरती स्वीकारावी प्राज्ञानींकवंता ।।धृ ।।
मछिंद्र, गोरक्ष जालींदरनाथ ।
कानिफा, चौरंगी, आडबंगीनाथ ।
रेवण,चरपटी, गहिनी, नि वटसिद्ध ।
भर्तरी आणि मीननाथ ।।१।।
जन्म आपुला ‘अयोनी संभव’ ।
त्यात ‘श्री दत्तात्रेय – अनुग्रह’ ।
तेणे प्रसन्न केली दैवते ।
संपादिली सर्व विद्या अस्त्रांते ।। २।।

त्या महान विद्या अस्त्रांते ।
केले हो सुखी सकळ जनांसी ।
चौऱ्यांशी सिद्ध करुनि ।
दत्त पंथाचा हा नाथ पंथाचा
हो वाढविला महिमा ।।३।।

चरणासी एकचि ” नम्र विंनती,
‘या बाळांवरी’ ठेवा कृपादृष्टी ” ।।
‘ नवनाथ ! नवनाथ !’ करिता धावा ।
तारुनि न्यावे ‘या बालकांना ‘ ।। ४।।

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग