अव्यक्त परब्रम्हा न्
3.
अव्यक्त परब्रम्हा न्हाणी पायांवरी । अभेद नरनारी मिळोनिया ॥१॥
पीतांबर पदरे पुशिला घननीळा । निजविला निर्मळ पालखांत ॥२॥
निंब कातबोळ त्रिगुण त्रिखुंडी । प्रेमाचे आवडी सेवी माय ॥३॥
एका जनार्दनी दत्त पाळण्यांत घातिला । हालविती त्याला अनुसुया ॥४॥
