आरंभिला यज्ञ सन्तोष
3.
आरंभिला यज्ञ सन्तोष सर्वत्र । आनंदे नगर दुमदुमीत ॥१॥
यज्ञनारायण सन्तोष पावला । प्रत्यक्ष तो आला कुंडांतुनी ॥२॥
पायस ते पात्र घेऊनिया करी । शृगीस झडकरी बोलतसे ॥३॥
विलंब करिता विघ्न ओढवेल । सत्वर वहिले भाग करा ॥४॥
नामा म्हणे देव येईल पोटासी । ऎंसे गूज त्यासी अग्नी सांगे ॥५॥
