सकळा मंगळाचे धाम।
2.
सकळा मंगळाचे धाम।
ज्याचेनि विश्राम विश्रांती ॥१॥
तो हा पंढरीचा रावो।
सकळा ठावो कल्याणा ॥२॥
ज्याचेनी सुखा सुखपण।
ज्याचेनी त्रिभुवन रुपस ॥३॥
निळा म्हणे ज्याचेनि निगमा।
आणिली गरिमा जाणिवेची ॥४॥
2.
सकळा मंगळाचे धाम।
ज्याचेनि विश्राम विश्रांती ॥१॥
तो हा पंढरीचा रावो।
सकळा ठावो कल्याणा ॥२॥
ज्याचेनी सुखा सुखपण।
ज्याचेनी त्रिभुवन रुपस ॥३॥
निळा म्हणे ज्याचेनि निगमा।
आणिली गरिमा जाणिवेची ॥४॥