वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 32. संत शेख महंमद › 1. संत शेख महंमद अभंग गाथा › 1. संत शेख महंमद अभंग गाथा संपूर्ण › 2. देव – भक्त संबंधपर

देव – भक्त संबंधपर

🙏 32. संत शेख महंमद · ABH-081041 · अभंग क्र. २

2.
देव – भक्त संबंधपर

चहु खाणी मधी हरि धन्य भावा ॥
निच भक्त तुझा सेवा करि ॥१॥
हरि उंच माझे ॥
निच तुझे तत्त्व तेणे वाढे तुझे महिमान ॥२॥
हरि माझी धरणी ति तुझे पर्वत दिसे शोभिवंत ॥
माझ्याने तुझे ॥३॥
हरि तु माझा प्रजन्य ॥
मी तव तुझ्या नद्या ।
सिंधु जाल्या सुध्या मी तु तैस्या ॥४॥
हरि तु माझे राउळ ॥
मी सुधी केरसुणी ।
दरबार झाडुनि पडिलि आसे ॥५॥
हरि तु माझा तरुवर ।
मी तुझे फुलफळ ॥
सोमति सकळ पत्रे खांद्या । ॥६॥
हरि तु माझा सिउ ।
मी तव तुझी शक्ति घरचार ।
हा व्यक्ति करू दोधे ॥७॥
हरि सेख महमद दोना वाचा ।
भेद चाले आनादि सिध आणति साधु ॥८ ।
हरि तु माझी विहीर ।
ती तव तुझी मोट चालतिल पाट ॥
पीकति मळे ॥९॥
हरि तु माझे आकाश ।
मी तव तुझा नाद ॥
प्रगट हा शब्द माझ्याने तुझा ॥१०॥
हरि तु माझा वोंकार ।
आकारिं मकार ॥
मा चा ची विस्तार ।
माझा तुझा ॥११॥
हरि मी भक्त यारुप ? तुच माझा बाप ।
आयायमने छेप तुझांत माझी ॥१२॥
हरि तु माझी साकर ।
मी तव तुझी गोडी ।
ऐसि वाढे प्रौढि ।
माझी तुझी ॥१३॥
हरि तु माझा समुद्र मी तव लवण ।
षड्रसे अन्न सरते होये ॥१४॥
हरि तू माझे रत्नः मी तो तुझा कीळ ॥
कोंदनि सुढाळ माझा तुझा ॥१५॥
हरि तु माझे मोती मी तो तुझे पाणी ॥
घट स्थानि स्थानी । तुझा माझा ॥१६॥
हरि तु सरता । माझ्याने अव्यक्ता ।
निर्गुणी हे वार्ता कोण जाणे ॥१७॥
हरि तु तेल वाति मी तव तुझा जयोति ।
नाहिं तरि भ्रांति आंधार खरा ॥१८॥
हरि तू माझे पोट । मी तव तुझी कांठि ।
बघ वागवितो कंठिं नाम तुझे ॥१९॥
हरि माझे नासिक मि तव तुझा ।
उस्वास जपमाळ सुरस आर्धउर्ध ॥२०॥
हरि येकविस हजर । सा शते आजप ।
उच्चारी उभय । सेख महंमद ॥२१॥ I
हरि तु माझा डोळा । मी अंत्र बाहुली ।
शरीर साउलि मीचि तुझी ॥२२॥
हरि तु माझे सिर मी तुझे पाउले ।
भाविके वंदिले तुझे म्हणउनि ॥२३॥
हरि पाउले मी जालो ।
चलण आसे तुझे जगी ।
केले माझे भुषण भक्ति ॥२४॥
हरि पाये नव्हति माझे ।
आवश तुंचि खरे ऐके सर्वेश्वरा ।
द्वैत माझे ॥२५॥
हरि पृथ्वी ळंका ।
मेरू धुरू लिंग ।
हरिसि माझा संग मी नदि जालो ॥२६॥
हरि तु माझे तीर्थ मि भक्त कापडि ।
भजन आवडि माझे तुझे ॥२७॥
हा नवविधी प्रतिष्ठा भक्ति आळंकार ।
मंडितुंना थोर । निज भक्ताचि ॥२८॥
हरि रवी ससि भक्त आरति उजळि ।
तारा दिप्ती मेळिं । वोवाळितो ॥२९॥
हरि तळी शेपराजा ।
तो मी भक्त तुझा मानिसिना ।
माझा आभार काही ॥३०॥
हरि गरुड रूद्र । कपनी लक्षुमी भवानि ।
पतिव्रताची खाणी । मज भक्तांची ॥३१॥
हरी तुज निर्गुणासि । सेख महमद बोले ।
आईकति भाविक श्रोतेराज ॥३२॥
हरि तू वेद सिंध ।
ति श्रुतिस्मृति पाच वाचा ति ।
तुझ्याने माझ्या ॥३३॥
हरि तू माझा परिस । मी तबं लोह धातु ।
माझ्याने तुझी मातु । वाढे पाहे ॥३४॥
हरि तू माझा वैद । मी दुःखी रोगीस्थ ।
तुं ओषध पावत । मी पथ तुझी ॥३५॥
हरि तु माझे तप । मी तुझी शांतता ।
दुसरी सायुज्यता । मीच तुझी ॥३६॥
हरि तु कागद नि वरि अक्षरे ।
पंडित विचारे मी बागेश्वरी ॥३७॥
हरि तू अनगर मी तुझे सगर ।
चालति योगींद्र मजवरी ॥३८॥
हरि तु माझे कांचन मी तुझे भूषण ।
लावेवरि कोंदण माझे तुझे ॥३९॥
हरि तु माझे सर्ग । मीच तुझे दळे ।
दुसरे पड़दाळे मीच तुझे ॥४०॥
हरि वड मी पारवि येका वृक्षा आंगी ।
सेख महमद जगा सांगति टिका ॥४१॥
हरि तु जाहाज । मी तुझे आ ले ।
बंदर पावले मज भक्ताचे ॥४२॥
हरि तु माझा वारा । मी तुझी वाळवटि ।
मज चकोरा दृष्टि तुज चंद्रासि ॥४३॥ I
हरि तु भयंक झळय मी त्याची मज ।
तुज दोहिचि प्रीति ऐसि ॥४४॥
हरि तु माझा आत्मा मी तुझी कल्पना ।
ऐके जगजीवना । भक्त हुणे आंगी ॥४५॥
हरि मी तुझे ऑगभूत तु माझ्याने ।
सरता जैसा सिंधु भरता । सरितानि ॥४६॥
हरि तू दिन निशि ॥
तु दादी मी मीसि चवि ।
रस्नेसि सेका वदना ॥४७॥
हरि तु झाकडू । ती सेवक गोडू ।
दोहीचा निवाडू । सेंदित जाला ॥४८॥
हरि वासे तृप्त । मन सेंधेने धाय पोट ।
ऐसा हाच तुष्ट तुझा माझा ॥४९॥
हरि भक्त सोडिना । निर्गुणा तुज खोडा ।
जैसा तो केवडा । केकति पोटि ॥५०॥
हरि तमी श्रीत । सेख महंमद ।
जैसा चंदन उद । संनिधाने ॥५१॥
हरि धन गरज मि तुझी विद्युल्लता ।
चमकवता । तुझा नधी ॥५२॥
हरि तु माझा तास । मी तुझा नाद ।
अद्वैति वा द्वैत भेद । तुझ्यात माझा ॥५३॥
हरि सारागंसिं । मी छतिस भार्या ।
स्वर तु आळवाया मुछना माझ्या ॥५४॥
हरि प्रकृतिसी ऐसि हे मीळणी ।
संभ्रम नटणी चौन्यासि लक्ष ॥५५॥
चराचरि हरि साकार मी माया ।
विळा सेविलिया । तुझी तुजमधे ॥५६॥
हरि माझा दोरा । मी तुझी बावडी ।
त्रीसूत्रे वोढी । मी भक्त पुंस ॥५७॥
हरि माझी रवी मी भक्त वारडि ।
गुसंळू परवडि महिशांति ॥५८॥
हरि मोणी तुप निज भक्त सेविति ।
ब्रह्मानंदे ढेकुर देति । उब्दोधाचे ॥५९॥
हरि धृतिचा सुगंध । उर्तिचा प्रकासे ।
जेवण समरसे भुक आभुकलि ॥६०॥
हरि तैसि भक्ति आद्वेत खरि ।
विवेके तत्त्व हेरि । सेख महमद ॥६१॥
हरि गडकोठः मी भक्त कवाडे ।
चरया निवाडे बुरजी माझ्या ॥६२॥
हरि माझे कुलुप मी भक्त कीली ।
उघड झाप केली हरि ॥६३॥
याया जाया हरि माझे नासिक मी भक्त उचकी ।
सींक जांभई गाजे की । माझी तुझी ॥६४॥
हरि माझे धनुष्य । मी भक्त सीत तिर ।
भातडि चतुर मी भक्त झालो ॥६५॥
हरि भांड़े गोळा ।
भक्त दारुरंजक आगा ।
जगजनक तु माझा ॥६६॥
हरि नवरदेव । मी बासिंगे करवलि ।
वरमाये हळदुलि ति भक्त जालो ॥६७॥
हरि माझा हस्ति । मी भक्त अंबऱ्या ।
घांटा वाजति बऱ्या । मज भक्ताच्या ॥६८॥
हरि कात चुना । मी भक्त पानसुपारि ।
वीडडीया मुखा भीतरि । मी भक्त रंगलो ॥६९॥
हरि बारा आदर ।
भक्त दढावीस आंगोळ्या आंगुष्ठास ।
तुझी माझी गोडि । ॥७०॥
हरि भक्ता भगवंताचा ।
निवाडा खल विदाचा ।
सेख महमदाचा अनुवाद ॥७१॥
हरि शुभ्र वस्त्रे मी भक्त राठसे ।
सोभीवंत दिवे । कुशळता ॥७२॥
हरि माझी धेनु । वासरुं मि भक्त ।
पान्हा तु द्रवत । मज भक्ता मुखी ॥७३॥
हरि आठरा धान्ये ।
मी भक्त पक्वाने जेवण वालेपणे ।
दोहिचे खरे ॥७४॥
हरि माझा नृपति । मी भक्त भद्र ॥
शोभसि चतुर । भक्तिने बरा ॥७५॥
हरि माझा तेजी ॥ मी भक्त खासदार ॥
जीवन तुजवर । मी भक्त जालो ॥७६॥
हरि राज्यधर ॥ ति पालखि भोई ॥
छत्र कर सई ॥ तु कळस वरि ॥७७॥
हरि माझे जंत्र ॥ मी भक्त पीळण्या तारा ॥
वाजवाजवी मी बरा । ति भक्तसवदि ॥७८॥
हरि केळिचे झाड हरि केळांचा घड ॥
रुचि गोडि सुघड ॥ तुझी माझी ॥७९॥
हरि बळिराज सीभ्री चक्रवर्ति ॥
आशपुरी सकति ॥ तुज हरिचि ॥८०॥
हरि श्रीयाळ बळिराज ।
गोहि साक्षी लागी ॥ हरिचंद्र योगी
॥ सेख महंमद ॥८१॥

3.

नर देहि पावलास । सद्गुरुताता ॥१॥
चहु खणीचि दुःखे सांगता आपार ।
येतुसे गहिवर आठविता ॥छ॥
जड देह तरुवर भलंताचि घालिघाये ।
दुःख करुणा नये । कोण्हांलागी ॥२॥
ज्या जैसे आवडे । तो तैसे तोडी ।
बहुजीव चरफडि । बोलता नये ॥३॥
संचित तुझे कृपे घाये बरे होति ।
मागुते तोडिति पालव नाव ॥४॥
पशुमछ आजा पुत्र । शस्त्रे विदारिती ।
हे दुःखे फजीति । न कळे कोण्हा ॥५॥
सयाति मध्ये वैराकार चाले ।
या दुःखाचे घायाळे । हरि पाहातोसि ॥६॥
हरि म्हणे प्रलब्धे । भोगिति सुखदुःख ।
भक्ति अभक्ति देख । वंदिति निंदिति ॥७॥
हे श्रीवचन ऐकोन । वैरागे आत्मज्ञान ।
पाहिले परतोन सेख महमदि ॥८॥

४.

तुम्ही कसे सोवळे सांगा जे मज कळे ।
चंदनाचे टिके । व्यर्धे केले १ छ ।
पीत्याचे सिश्न मुत्राचे रोजन ।
ते वाटे येऊन पडलेति खोळे ॥छ ।
अशुद्धाचे आळे । विष्टेचे पेटाळे ।
नवमास विटाळे । वाढले ते ॥२॥
गर्भाचि जाचणी आधोमुखे दुर्घाणी ।
कुंभपाके उकडोनि स्थुळ जाले ॥३॥
ऐसे शरीर वोवळे । ते काये सोवळे ।
भरलि ढिसाळे । अविद्योचि ॥४॥
नश्वर शरीरा । गंधाक्षत करा ।
पाणीनाचे विश्व साधुविण ॥५॥
विषयांचि धार । पापाचे डोंगर ।
विधीचे पसर । नका दाऊ ॥६॥
संताप अनुराग । दोन्ही माहार मांग ।
अहंकारे हा धींग मांडिलासे ॥७॥
कल्पना माहारि वासना चांभारि ।
तुम्हा परोपरिं बाटविती ॥८॥
सकाल ज्या रांडा पेंढारणी भांडा ।
त्यानि तुमच्या तोंडा । बोडविले ॥९॥
संकल्प न्हावी । विकल्प दावि मिथ्या देवा देवि ।
नका करू ॥१०॥
ऐसि अंगसंगे वागविता भींगे ।
का घेतलि सोंगे ब्राह्मणोचि ॥११॥
चंदना लावावे । तरि चंदन तसे व्हावे ।
नाहीतर गळावे । गर्भीहूनि ॥१२॥
हृदयी नाम सडा । प्रेम बोधा गाढा ।
तो ब्राह्मण थोडा । विरळागत ॥१३॥
सेख महंमद साचे । बोलियेले वाचे ।
आचार विप्राचे । भावातळि ॥१४॥

५.

दयाळु म्हणवणे । हरि लाजीरवाणे ।
बिंदि वमनि । सेख महमद ॥१॥
चांगुण श्रीयाळ । वधीला त्याचा बाळ ।
सिरमागे केवळ । म्हणे रडो नका छ ।
मलकाई अर्जुन । जा विले कर चरण ।
नेणसि तु जीवन । निष्टु धेंडीया ॥२॥
सीधी चक्रवती मला । शस्त्रे विदारिला ।
नाहि करुणा तुला । ससाणा हासि ॥३॥
स्त्री पुत्राच्या हाते । कर्वतविले चंद्र हास्या ।
येता अनुपाते । धड नेघसि ॥४॥
प्रल्हाद आवडला कस्यप विदारिला ।
न भजे जाणोन केला घात त्याचा ॥५॥
सिता भक्ते नेली त्याचि त्वां शांति केली ।
हे नव्हेस खोलि परमार्थाचि ॥६॥
कोंस मामा शरिरी स्वगे तले उरि ।
तुं घातक क्षेत्र बोकाचे न्याय ॥७॥
सुदाम्याचे घेऊन बळिस मागसि दान ।
दृपदि पासि वाण । घेऊन उदार ॥८॥
कर्ण परिक्षिती अक्रूर । उद्धव हरिश्चंद्र ।
रखुमांगद कबीर त्या कसून पाहिले ॥९॥
सांगता भक्त कोडि वाढेल बहुत प्रौढी ।
नामदेव आवडि मांडिली येथे ॥१०॥
देव भक्तांचा गता भक्त उदार दाता ।
लाज नये आनंता उदार म्हणविता ॥११॥
सुखाचा मागता हा सळितो नाना परि ।
धन्य भक्ताचे निर्धारि जाण होतसे ॥१२॥
स्वसुपति वरि लोळण ॥ सळत्या लासळण ।
धर्म नष्ट लक्षणे श्री गोपाळा ठाई ॥१३॥
हरि सिवकारि तत्पर । भक्ता मुक्ति उधार ।
ऐसा लंड सिरजोर । दुसरा नाही ॥१४॥
ऐसा अव्यक्त खाडिल । भक्ति केला आमोल ।
रोख महमदिं सखोल । वर्णिला वाचे ॥१५॥

६.

निसंग निलज होई वो धांगडि ॥
मग तुज लागेल गोडि परब्रह्मिचि ॥१॥
या लोकीकाची लाज धरसिल धमकटि ( ?) ॥
तरि तुज जगजेठि नातुडति ॥२॥
नश्वर शरीर याचि काये लाज ॥
साधुनि घेई काज ॥ जो जिवित्व आहे ॥३॥
देह विठलाचे झाड : उचिष्ट वोवळे ॥
ते काय सोवळे होईल तुज ॥४॥
सेख महमद म्हणे प्रकृति साजणी ॥
भाव धरूनि मनि जाविद्या सोडा ॥५॥

७.

निट बसा डोळे पुसा ।
घातला पवसा झोपेने ॥१॥
कर्णबिळि ॥ वैसलि टाळि ॥
नाम नव्हाळि । ऐको नेंदि ॥२॥
कानि बोंब मारा सावद करा ।
नाम उपचारा सेख महमद म्हणणे ॥३॥

८.

प्रतिमा दुलिता ॥ सळति देवरुसि ॥
गवणे केलं दासि तेतिस कोडि ॥१॥ ॥ छ ॥
तेव्हा काय सामर्थ्य जाहाले होते त्याचे ॥
बंद राक्सचि फोड वेतना ॥छ ।
सिध्याचि मि जी म्हणविले सेळिने ॥
गावाप गजा डोईवीर आणिली ॥२॥
तैसे समर्था सद्गुरुचे ॥ व्होवे धीर आतरिं ॥
देवते भुते फाडितना ॥३॥
पाहा रावेस राबणे । पुंजीले शुळपाणी ॥
सिर कमळे पाहुनि आराधीले ॥४॥
पाखला जे देणे सांगति प्रसिद्ध ॥
सेख महमद पुरानविद ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग