वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 13. एकादशी, द्वादशी, व क्षिरापतीचे अभंग › १. एकादशी अभंग

एकादशीस अन्नपान । जे

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073387 · अभंग क्र. ३

3.
एकादशीस अन्नपान । जे नर करिती भोजन ।
श्‍वानविष्ठेसमान । अधम जन ते एक ॥१॥
ऐका व्रताचे महिमान । नेमे आचरती जन ।
गाती ऐकती हरिकिर्तन । ते समान विष्णुसी ॥२॥
अशुद्ध विटाळशीचे खळ । विडा भक्षिता तांबुल ।
सांपडे सबळ । काळाहाती न सुटे ॥३॥
सेज बाज विलास भोग । करिती कामिनीचा संग ।
तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥४॥
आपण नवजे हरिकीर्तना । आणिका वारी जाता कोणा ।
त्याच्या पापे जाणा । ठेंगणा तो महोमेरु ॥५॥
तया दंडी यमदुत । झालेस तयाचे अंकित ।
तुका म्हणे व्रत । एकाद्शी चुकलिया ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग