साकारू निराकारू वस्त
742.
साकारू निराकारू वस्तु सद्गुरु आमुचा ।
तेणे या देहाचा केला उगऊ ॥१॥
उगविले उगविले मायेंते निरसिले ।
एकत्व दाविले त्रिभुवन रया ॥२॥
सत्रावी दोहोनी इंद्रिया सौरसु ।
गुरूमुखे उल्हासु भक्तिमहिमे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे मी नेणता प्रपंची ।
तोडली मोहाची पदवी आम्ही ॥४॥
अर्थ :
आमचा श्रीगुरू हे सगुण व निर्गुण परमात्म्याचे मूर्तिमंत स्वरूप असून त्यांनी आमच्या तिन्ही देहाचा उलगडा करून दाखविला. सत्रावी जी जीवनकला हीच कोणी कामधेनु तिचे गुरूमुखाने धार काढून भक्तिप्रेमानंदाचा महीमा सर्व इंद्रियांना प्राप्त करून दिला. आम्ही गुरूकृपेने प्रपंचाच्या मोहाची बेडी तोडून टाकून परमानंद स्थितिला प्राप्त झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगता
