थुंकोनिया मान । दंभ
741.
थुंकोनिया मान । दंभ करितो कीर्तन ॥१॥
जालो उदासीन देही । एकाविण चाड नाही ॥धृपद॥
अर्थ : अनर्था सारिखा । करूनि ठेविला पारिखा ॥२॥
उपाधि वेगळा । तुका राहिला सोवळा ॥३॥
अर्थ :
मान, सन्मान या गोष्टींचा त्याग करून मी कीर्तनात दंगून जात आहे. देहा विषयी मी उदासीन झालो आहे, एका देवावाचून मला दुसरी आवड नाही.अर्थ : म्हणजे पैसा, धन तो अनर्थ आहे म्हणून मी त्याला वेगळा ठेवला आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी सर्व प्रकाच्या उपाधी पासून वेगळा सोवळा (शुद्ध) अलिप्त राहिलो आहे.
