नामे तुमची गाऊ मुखे
738.
नामे तुमची गाऊ मुखे ।
राहो सुखे चितंनी ॥१॥
आणखी नेघो दयाल तरी ।
पढो वैखरी गुण तुमचे ॥२॥
ठाको उभा संतमेळी ।
करु धुमाळी हरिकथा ॥३॥
निळा म्हणे नित्य नवी ।
सेवा घ्यावी कृपाळुवा ॥४॥
738.
नामे तुमची गाऊ मुखे ।
राहो सुखे चितंनी ॥१॥
आणखी नेघो दयाल तरी ।
पढो वैखरी गुण तुमचे ॥२॥
ठाको उभा संतमेळी ।
करु धुमाळी हरिकथा ॥३॥
निळा म्हणे नित्य नवी ।
सेवा घ्यावी कृपाळुवा ॥४॥