वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ८, श्री निवृत्ती प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२१ ते ७५८

ब्रह्मी ब्रह्म होणे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074520 · अभंग क्र. ७३९

739.
ब्रह्मी ब्रह्म होणे हे तो कठीण सांगता ।
आब्रह्मीता जयाचिया सत्ता विस्तारले ॥१॥
सांगता नये सांगावे ते काय ।
तेथील हे सोय गुरुखुणा ॥२ ।
मन अमोलिक जरी गुंफे अमूपा ।
तरीच हा सोपा मार्ग रया ॥३॥
बापरखुमादेविवरू ब्रह्मविद्येचा पुतळा ।
तेथील हे कळा निवृत्तिप्रसादे ॥४॥

अर्थ :
तृणकाष्टापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व जग ज्याच्या सत्तेने विस्तारले आहे म्हणजे व्यापलेले आहे. अशा व्यापक ब्रह्माच्या ठिकाणी मुमुक्षुने आपणच ब्रह्म कसे व्हावे. ते शब्दाने सांगता येणे कठीण आहे. तथापि जे शब्दाने सांगता येत नाही. ते सांगवे तरी कसे? तथापि ते सांगण्याला सोय फक्त श्रीगुरूकृपेचीच आहे. त्याला एकच मोठा उपाय आहे. तो हा की अमोलिक मन व्यापक परमात्म्याच्या ठिकाणी जर गुंतले तर परमात्मस्वरूपाला पोहोचण्याचा मार्ग सोपा आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, ते साक्षात् ब्रह्मविद्येचा पुतळा आहेत. त्याच्या प्राप्तीची कळा श्रीगुरूनिवृत्तिरायांच्या कृपाप्रसादानेच कळणार आहे. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग