आपल्या स्थितीसंबंधान
748.
आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
अखंडता ते झाली ऐसी ।
विठ्ठल राहिला मानसी ।
ध्यानी मनी लोचनासी ।
अहर्निशी निजबोध ॥१॥
जनी वनी जनार्दन ।
नाढळे त्या भिन्नाभिन्न ।
एकात्मता अनुसंधान ।
नित्य दर्शन विठठली ॥२॥
देही असोनी देहातीत ।
गुणी गुणाते नातळत ।
विषयी विषयापासुनी मुक्त ।
भोगी भोगासक्त नव्हती ते ॥३॥
नित्य निरामय निर्गुण ।
जगादात्मा जो आनंदघन ।
विटेवर पाउले समान ।
लोधले मन चरणी त्या ॥४॥
निळा म्हणे विठ्ठल जपे ।
सांडिले ते पुण्यपापे ।
संकल्प सोडिले विकल्पे ।
त्रिविधतापे स्वानुभवी ॥५॥
