वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ८, श्री निवृत्ती प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२१ ते ७५८

अवघड ते एक घडले माझ्

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074493 · अभंग क्र. ७४७

747.
अवघड ते एक घडले माझ्या अंगी ।
तीही ऋण चौघी मज देवविले ॥१॥
ज्यासी दिधले त्यासी नांव पै नाही ।
जया रूप नाही त्यासी ऋण देवविले ॥२॥
निवृत्ति गुरूने अधिक केले ।
निमिष्यमात्री दाविले धन माझे ॥३॥
येणे रखुमादेविवरू विठ्ठले होते ते आटिले ।
सेखी निहाटिले निळारंभी ॥४॥

अर्थ :
मनुष्यशरीरांत परमात्मप्राप्ती होणे हे अत्यंत अवघड आहे. परंतु ते आज माझ्या शरीराच्या ठिकाणी घडून आले. संचित क्रियमाण प्रारब्ध या तिघांच्या प्रेरणेने चित्त चत्तुष्टयाने पत्करलेला देहात्मभाव हेच कोणी ऋण परमात्म्याला देवविले. पण चमत्कार असा झाला की ज्या परमात्म्याला ऋण देवविले त्याला नाव नाही, रूप नाही, काही एक नाही. त्याला ऋण देवविले. असे माझे सर्वस्व धन देहात्मभाव तो परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी दिला. वस्तुतः ते परमात्मस्वरूपच खरे धन होते. ते विसरून मी देहात्मभावालाच माझे धन मानीत होतो. परंतु माझे खरे धन जे आत्मस्वरूप ते एका क्षणांत निवृत्तिनाथांनी मला दाखविले. त्यांच्या प्रसादाने रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठलांनी माझे देहात्मभावाचे धन नाहीसे करून निरालंब परमात्मस्वरुपाचे ठिकाणी मला पोहोचते केले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग