देवावरील भार । काढू
740.
देवावरील भार । काढू नये काही पर ॥१॥
तहानभुके आठवण । घडे ते बरे चिंतन ॥धृपद॥
देखावी निश्चिंती । तोचि अंतर श्रीपती ॥२॥
वैभव सकळ । तुका मानितो विटाळ ॥३॥
अर्थ :
देवाच्या चरणांवर जो आपण भार टाकला आहे तो कधी काढू नये, ज्यावेळी तहान भूक लागते त्यावेळी त्याचे चिंतन होते हे चांगले आहे. त्याचे चिंतन केले नाही मग तर तो आपल्या पासून दुरावतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा समोर मी हे संसारीक वैभव त्याज्य मानतो.
